धानुरी अत्याचारप्रकरणी फकिरा ब्रिगेडचा  रास्ता रोको

आंदोलनादरम्यान रूग्णवाहिका येताच मार्ग करुन दिला मोकळा !
 
s

उस्मानाबाद - लोहारा तालुक्यातील धानुरी येथे चार वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करणार्‍या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी फकिरा ब्रिगेडच्या वतीने आज (दि.17) सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलन सुरु असताना रुग्णाला घेऊन जाणारी रुग्णवाहिकेला आंदोलकांनी तात्काळ मार्ग मोकळा करुन पुन्हा आंदोलन सुरू ठेवले, त्यामुळे रूग्णाच्या नातेवाईकांनी आंदोलकांचे आभार व्यक्तकेले.

यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, धानुरी येथील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, या खटल्याकरिता अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, तसेच पीडित कुटुंबाचे पुनवर्सन करावे. आरोपीच्या कुटुंबीयांकडून फिर्याद मागे घेण्यासाठी पीडित कुटुंबाला धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे पीडितांना पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

त्याचबरोबर लोहारा तालुक्यातील जेवळी येथील भूखंड क्रमांक 83 व 98 हे कोणाच्या नावावर असून त्यावर कोणाची घरे आहेत याची लेखी स्वरुपात माहिती देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आलेली आहे.

या आंदोलनात फकिरा ब्रिगेडचे मराठवाडा अध्यक्ष श्रीरंग सरवदे, नागिणी थोरात, मायावती सगट, राम गवळी, लखन गवळी, राम दंडगुले, बालाजी दंडगुले, दत्ता कांबळे, राधिका गवळी, काजल गवळी, मीराबाई गवळी, इंदाबी भालेराव, अनुसया गवळी, अंबुबाई ईटकर, चंद्रभागा गवळी यांच्यासह फकिरा ब्रिगेडचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
 

From around the web