उस्मानाबाद लाइव्हचा दणका : जिल्हा परिषदेत कंत्राटी पदाची पदभरती पारदर्शक होणार 

पैसे मागणाऱ्याची नावे कळवा : सीईओ राहुल गुप्ता यांचे आवाहन 
 
zp

उस्मानाबाद - उस्मानाबाद जि. प. आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये कंत्राटी पदाच्या  पदभरतीमध्ये घोटाळा होत असल्याचे वृत्त उस्मानाबाद लाइव्हने २८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची राज्याचे आयुक्त ( आरोग्य विभाग ) तुकाराम मुंडे यांनी गंभीर दखल घेतली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी एक पत्रक काढून उमेदवारांना जाहीर आवाहन केले आहे. 

कंत्राटी स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, एम.पी. डब्ल्यू या पदाची पारदर्शक पद्धतीने भरती होणार असल्याचे सांगून, कुणी पैश्याची मागणी केल्यास किंवा तसे कॉल आल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन सीईओराहुल  गुप्ता यांनी केले आहे. 


त्याचे असे झाले, उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अंर्तगत येणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियान ( NHM ) मध्ये कंत्राटी पदाची पदभरती करण्यासाठी एका वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. . ही भरती करताना लेखी परीक्षा न घेता थेट तोंडी मुलाखती ठेवण्यात आल्या होत्या. . ही भरती करतांना एक ते दोन लाख रुपयाची मागणी देखील करण्यात येत होती. 

या संदर्भात उस्मानाबाद लाइव्ह ने  २८ ऑक्टोबर रोजी बातमी प्रसिद्ध केली होती, त्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली होती तर पैसे घेणाऱ्या आरोग्य  कर्मचाऱ्याचे धाबे दणाणले होते. 

बातमीची लिंक जि. प. आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये कंत्राटी पदाची पदभरतीमध्ये महाघोटाळा

या बातमीची राज्याचे आयुक्त ( आरोग्य विभाग ) तुकाराम मुंडे यांनी गंभीर दखल घेतली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी एक पत्रक काढून उमेदवारांना जाहीर आवाहन केले आहे. 

त्यांचे आवाहन असे ---

s

From around the web