कुन्हाळी, हिप्परगा येथील तीर्थक्षेत्राना 'ब' दर्जा

काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे यांच्या प्रयत्नांना यश
 
news

उस्मानाबाद -  उमरगा तालुक्यातील कुन्हाळी येथील श्री हनुमान मंदिर आणि हिप्परगा (राव) येथील श्री यमाईदेवी देवस्थानला ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत 'ब' दर्जा प्राप्त झाला आहे. यासाठी उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे गटनेते तथा काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यास मोठे यश मिळाले आहे.  दोन्ही मंदिराच्या ठिकाणी प्रत्येकी दोन कोटी अशी एकूण चार कोटी रुपयांची विकासकामे होणार असून भाविकांची गैरसोय दूर होणार आहे.

ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रे विकासापासून वंचित असल्याने येथे येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा मिळत नाहीत. उमरगा तालुक्यातील कुन्हाळी येथील हनुमान मंदिर भक्तांमध्ये जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. तर हिप्परगा(राव) येथील श्री यमाईदेवी देवस्थान देखील प्रसिध्द आहे. भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या दोन्ही तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे गटनेते प्रकाश आष्टे यांच्याकडे कैफियत मांडली होती. त्यांनतर श्री. आष्टे यांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून कुन्हाळी  आणि हिप्परगा (राव) येथील मंदिराना  तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, तसेच ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेतून निधी मिळावा यासाठी प्रयत्न केले होते. त्यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून दोन्ही तीर्थक्षेत्राना 'ब' वर्ग दर्जा मिळाला आहे. त्यामुळे दोन्ही मंदिराचा ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास निधीतून कायापालट होणार असून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा मिळणार आहेत. उमरगा तालुक्यातील कुन्हाळी व हिप्परगा (राव) येथील मंदिराबरोबरच कळंब तालुक्यातील मलकापूर येथील श्री दत्त मंदिर संस्थानला देखील 'ब' दर्जा मिळाला आहे.

 प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा माजी मंत्री बसवराज पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विशेष प्रयत्नातून देवस्थानला तीर्थक्षेत्र 'ब' दर्जा मिळाल्याबद्दल प्रकाश आष्टे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.

From around the web