औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर

 
f

उस्मानाबाद -  भारत निवडणूक आयोगाचे पत्रान्वये दि. 29 डिसेंबर 2022 पासून औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून निवडणूक आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

             गुरुवार, दि. 5 जानेवारी 2022 रोजी निवडणूक अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. गुरुवार, दि. 12 जानेवारी 2022 रोजी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस. शुक्रवार दि. 13 जानेवारी 2022 रोजी अर्जाची छाननी. सोमवार, दि. 16 जानेवारी 2023 रोजी अर्ज माघार घेण्याचा अंतिम दिवस. सोमवार, दि. 30 जानेवारी 2023 रोजी मतदान प्रक्रिया सकाळी 8:30 ते दुपारी 4:00 पर्यंत होणार आहे. गुरुवार, दि. 2 फेब्रुवारी 2023 रोजी मतमोजणी केली जाणार आहे.

आमदार औरंगाबाद विभागातील शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये विक्रम काळेंनी विजयाची हॅट्ट्रिक नोंदवली आहे. सलग चौथ्या वेळी विजयी होण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. 


भाजपकडून किरण नारायण पाटील 

 फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकासाठी भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवार जाहिर करण्यात आला आहे. किरण नारायण पाटील यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी १४ ऑक्टोबररोजी भाजपमध्ये प्रवेश दिला. २२ ऑक्टोबररोजी औरंगाबाद विभागाच्या शिक्षक मतदारसंघातून त्यांची उमेदवारी जाहिर करण्यात आली.

From around the web