'त्या' नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार-ॲड.प्रज्ञा खोसरे

महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाच्या सदस्य ॲड.प्रज्ञा खोसरे यांनी घेतली पीडीतेची भेट
 
as

उस्मानाबाद - तुळजापूर तालुक्यातील एका अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर पाशवी अत्याचार झाल्याची घटना दुर्दैवी आहे. या गुन्ह्यातील नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे  बाल हक्क आयोगाच्या सदस्य ॲड.प्रज्ञा खोसरे यांनी सांगितले.

तुळजापूर तालुक्यात काल सात वर्षांच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तर पीडित मुलीवर तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर अतिरक्तस्राव झाल्यामुळें उस्मानाबाद येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान आज (दि.31) महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाच्या सदस्य ॲड.प्रज्ञा खोसरे यांनी पीडित मुलीची भेट घेऊन तिच्या कुटुंबियांची विचारपूस केली. तसेच पोलीस प्रशासनाने दाखल केलेल्या गुन्ह्याची माहिती घेतल्यानंतर माध्यमांशी त्या बोलत होत्या. हे प्रकरण अतिशय निंदणीय असून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा केली असल्याचे त्यांनी सांगितले

यावेळी  मनीषाताई राखुंडे, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष दयानंद काळुंके, सर्व सदस्य आणि डीसीपीयू अधिकारी ,मनोज मुदगल, अमोल सुरवसे आदी उपस्थित होते.

From around the web