ॲड. विश्वजीत शिंदे यांनी खा.राहूल गांधी यांच्याकडे मांडले वकिलांचे प्रश्न 

 
s
ॲड. विश्वजीत शिंदे यांनी देगलूर ते  हिंगोली असा १२२ किलोमीटर पायी प्रवास करून भारत जोडो पदयात्रेत आपला सहभाग नोंदविला... 

उस्मानाबाद - काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांच्या कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर भारत जोडो पदयात्रेचे महाराष्ट्रात  देगलूर  ( नांदेड ) येथे आगमन झाल्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. काँग्रेसच्या विधी विभागाचे राज्य उपाध्यक्ष ॲड. विश्वजीत शिंदे यांनी देगलूर ते  हिंगोली असा १२२ किलोमीटर पायी प्रवास करून भारत जोडो पदयात्रेत आपला सहभाग नोंदविला. 

या  पदयात्रेदरम्यान  ॲड. विश्वजीत शिंदे यांनी खा. राहूल गांधी यांची नांदेड येथे भेट घेऊन वकिलांच्या अडचणी व प्रश्न मांडले तसेच केंद्रात कॉग्रेस पक्षाची सत्ता आल्यावर वकील संरक्षण  कायदा पारित करण्याची मागणी केली तसेच न्यायालयात वकील नोंदणी करते वेळी वकिलासाठी जीवन संरक्षण  विमा  देण्यात यावा, वकीलांना राष्ट्रीयकृत बॅकेकडून विनातारण कर्ज देण्यात यावे, ज्युनिअर विधिज्ञ व महिला विधिज्ञांना दरमहा आर्थिक साहाय्य द्यावे आदी मागण्याचे निवेदन दिले. 

ॲड. विश्वजीत शिंदे यांनी या मागण्या  केंद्र व राज्य सरकारकडे अनेक वेळा  केल्याचे सांगितले. वकील संरक्षण  बिलचा मसुदा तयार केला असल्याचेही त्यांनी  सांगितले. यावर ॲड. विश्वजीत शिंदे यांना सकारात्मकता दाखवून खासदार राहूल गांधी यांनी सविस्तर चर्चासाठी दिल्ली येथे भेटण्यास सांगितले. 

यावेळी  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले, कार्याध्यक्ष आमदार डॉ. विश्वजीत कदम, आमदार भाई जगताप, राष्ट्रीय समन्वयक रविंद्र दळवी, प्रदेश सचिव दत्तु भालेराव, युवक प्रदेश सरचिटणीस अभिजीत चव्हाण, किसान कॉग्रेस जिल्हाध्यक्ष गौरीशंकर मुळे, सरचिटणीस बालाजी नायकल व इतर प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

ॲड. विश्वजीत शिंदे हे कॉग्रेस पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी (प्रदेश उपाध्यक्ष - विधि, मानवी हक्क व आर.टी.आय. विभाग) असुन ऑल इंडिया फेडरेशन ऑफ ॲडव्होकेटस अन्ड असोशिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. ॲड. विश्वजीत शिंदे हे समाजसेवेसोबत अनेक काळापासुन वकिलांच्या हितासाठी प्रयत्न करत आहेत व वकील सरक्षण कायदा ही त्यांची अनेक वर्षापासुन मागणी आहे.

From around the web