उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य आणि जुगार  विरोधी कारवाई

 
crime

भूम  : अवैध मद्य विरोधी कारवाई दरम्यान भुम पोलीस ठाण्याच्या पथकाने दि. 12.09.2022 रोजी 16.05 वा. सु. चिंचपुर ते वालवड रस्त्याचे कडेला चिंचपुर ढगे शिवारात छापा टाकला असता चिंचपुर ग्रामस्थ- निलेश तात्या शिंदे हे त्याठिकाणी देशी दारु संत्रा कंपनीच्या 180 मि.ली. क्षमतेच्या 11 बाटल्या असा एकुण अंदाजे 770 ₹ किंमतीचा मद्य साठा अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना पथकास आढळले.

तुळजापुर  : अवैध मद्य विरोधी कारवाई दरम्यान तुळजापुर पोलीस ठाण्याच्या पथकाने दि. 12.09.2022 रोजी 16.15 वा. सु. मंगरुळ शिवारातील तुळजापुर-ईटकळ रोडलगत वैष्णवी पानटपरीच्या बाजुला छापा टाकला असता इटकळ ग्रामस्थ- श्रीनिवास अर्जुन पांढरे हे त्याठिकाणी विदेशी दारु आय.बी कंपनीच्या 180 मि.ली. क्षमतेच्या 48 बाटल्या असा एकुण अंदाजे 7,200 ₹ किंमतीचा मद्य साठा अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना पथकास आढळले.

यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अंतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवले आहेत.

जुगार विरोधी कारवाई

जुगार विरोधी कारवाई दरम्यान उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, उमरगा यांच्या पथकाने व उमरगा पो.ठा. च्या पथकाने दि. 12.09.2022 रोजी उमरगा शहरात 04 ठिकाणी छापे टाकले. यात शासकिय नगर झोपडपटटी, उमरगा येथील- सचिन चंद्रकांत बनसोडे व शिनु सगर हे दोघे 15.00 वा. सु. बालाजी नगर येथील मुंसांडे कॉम्प्लेक्स समोरील रोडचे मोकळया जागेत कल्याण मटका जूगाराचे साहित्यासह 14,590 ₹ रोख रक्कम बाळगलेले, तर कार्ले प्लॉट उमरगा येथील- गुंड बिरु घोडके हे 15.30 वा चे सुमारास महादेव रेस्टॉरंट समोरील मोकळ्या जागेत कल्याण मटका जुगारासे साहित्यासह 13,620 ₹ रोख रक्कम बाळगलेले असताना उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, उमरगा यांच्या पथकास आढळले. तसेच तुरोरी येथील- महेश विश्वनाथ कांबळे हे 14.40 वा. सु. प्रभात हॉटेलच्या पाठीमागे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह 1,010 ₹ रोख रक्कम बाळगलेले, तर काळामठ, उमरगा येथील- मनोज दिगंबर गायकवाड हे 14.50 वा. सु. पतंगे रोड ते शिवपुरी कडे जाणारे रोडवर कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह 520 रु रोख रक्कम बाळगलेले असताना उमरगा पो.ठा. च्या पथकास आढळले.

यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत उमरगा पो.ठा. येथे स्व:तंत्र 04 गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web