डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह विविध मागण्यांसाठी रिपाइंचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण आंदोलन

 
sd

उस्मानाबाद -- तुळजापूर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी ठेकेदाराला तात्काळ कार्यारंभ आदेश देण्यात यावेत यासह विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) च्या वतीने उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ व जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम यांच्या नेतृत्वाखाली आज (दि.24) लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आले. मागण्यांची दखल न घेतल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. या आंदोलनास भिमशक्ती संघटनेच्या वतीने मेसा जानराव यांनी पाठींबा दिला.


रिपाइंच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी ठेकेदाराला तात्काळ कार्यारंभ आदेश देण्यात यावेत, तुळजापुरातील आदिमाया आदिशक्ती (मातंगी) मंदिराच्या बाहेर जाण्याचा मार्ग कायमस्वरुपी सुरू करण्यात यावा, तुळजापूर तालुक्यातील तीर्थ (बुद्रुक) आणि उस्मानाबाद तालुक्यातील वडगाव (सि.) व तेर येथील बौद्ध स्तूपावर हिंदू देवदेवतांच्या नावाखाली अतिक्रमण करण्यात आलेले आहे. ते पुरातत्व विभागाने उत्खनन करुन ती मंदिरे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावीत, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना सरसकट 50 हजार रुपये आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी, संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावणबाळ योजनेसाठी 21 हजार रुपये उत्पन्नाची अट रद्द करावी व पगारी नियमित कराव्यात, मुंबई दादर स्टेशनचे चैत्यभूमी असे नामकरण करण्यात यावे, डॉ.आंबेडकर चौकामध्ये गणपत नरवडे याने नगर परिषदेच्या जागेत खोटी कागदपत्रे बनवून अतिक्रमण करुन बांधकाम केलेले आहे हे बांधकाम पाडण्यात यावे अथवा नगर परिषदेने ताब्यात घ्यावे, महात्मा फुले, अण्णा भाऊ साठे, संत रोहिदास, अण्णासाहेब पाटील, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळांना प्रत्येकी एक कोटी रुपये बजेट देण्यात यावे व पन्नास हजार रुपये सबसिडी मंजूर करावी, 

तुळजापूर तालुक्यातील खडकी येथील बौद्ध समाजावर हल्ला करणार्‍या जातीयवादी गावगुंडांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, तुळजाभवानी मंदिरात छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करणार्‍या तहसिलदार योगीता कोल्हे व नागेश शितोळे यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी, शैक्षणिक पात्रता नसताना नागेश शितोळे यांना दिलेल्या पदोन्नतीची चौकशी करावी, जात प्रमाणपत्र काढण्यासाठी असणार्‍या जाचक अटी रद्द कराव्यात, दादर इंदुमिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा 350 फूट उंचीचा ठेवण्यात यावा, राजस्थानमधील जालोर येथे तिसरीत शिकणार्‍या दलित विद्यार्थ्याला माठातून पाणी प्यायल्याच्या कारणावरुन मारहाण करणार्‍या शिक्षकास शिक्षा देण्यात यावी, उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूर येथील गट नं. 154 मध्ये राखीव ठेवलेूली 17 गुंठे जमीन दलित लाभार्थ्यांना देण्यात यावी, कानेगाव येथील नियोजित बौद्ध समाजमंदिराला जागा देण्यात यावी अशा 18 मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

उपोषण आंदोलनात रिपाइंचे मराठवाडा उपाध्यक्ष आनंद पांडागळे, जिल्हा संपर्कप्रमुख विद्यानंद बनसोडे, जिल्हा संघटक सोमनाथ गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष रणजित गायकवाड, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अस्मिता पारवे, जिल्हा सचिव ज्योती लोखंडे, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, जिल्हा सचिव एस.के. गायकवाड, युवक कार्याध्यक्ष अरूण लोखंडे, जिल्हा कार्याध्यक्ष मोहन बनसोडे, तालुकाध्यक्ष बाबासाहेब मस्के, विधानसभा अध्यक्ष प्रकाश कदम, तुळजापूर शहराध्यक्ष अरुण कदम, युवक शहराध्यक्ष अमोल कदम, कामगार आघाडी अध्यक्ष आप्पा कदम, युवक शहर सचिव आतिश कदम, युवक नेते संतोष बनसोडे, उस्मानाबाद तालुकाध्यक्ष भालचंद्र कठारे, उस्मानाबाद शहराध्यक्ष उदय बनसोडे, कामगार आघाडी उपाध्यक्ष महादेव सोनवणे, सचिव तानाजी डावरे, युवक उपाध्यक्ष वैजिनाथ पांडागळे, विक्रांत हावळे, चंचल कदम, निशांत कदम, हणमंत सोनवणे, बाबा जानराव, भैरव कदम, हमीद बेग, चोखोबा सिरसट, सुधाकर मस्के, संदीपान कांबळे, बसवंत जाधव, हिरा भालेकर, बाळू डावरे, आनंद कदम, गुणवंत कदम, पंडित भोसले, यांच्यासह रिपाइंचे उस्मानाबाद जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
 

From around the web