बेंबळी ग्रापंमधील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी सदस्यांचे उपोषण आंदोलन

सरपंच व ग्रामसेवकांनी करोडो रुपये हडपल्याचा आरोप
 
s

उस्मानाबाद - तालुक्यातील बेंबळी ग्रामपंचायत मध्ये सरपंच व ग्रामसेवक यांनी संगणमत करून करोडो रुपयांचा अपहार केल्याच्या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी यासाठी बेंबळी  ग्रामपंचायतच्या नऊ सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे

 बेंबळी ग्रामपंचायतच्या सरपंच वंदना कांबळे व तत्कालीन ग्रामसेवक ए.व्ही आगळे यांनी संगणमत करून दलित वस्ती सुधार योजना, तांडा वस्ती सुधार योजना,१५ वा वित्त आयोग, जलजीवन मिशन, तसेच इतर योजनेतून अपहार केल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे.
 
विविध विकास योजना, खात्यावरील विविध कामाच्या बोगस कागदपत्र दाखवून सरपंच पदाचा व ग्रामसेवक पदाचा फायदा घेऊन लाखो रुपयांचा अपहार करणाऱ्या सरपंच व तत्कालीन ग्रामसेवक यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर मुदतीत कायदेशीर कठोर कारवाई व पदमुक्त करून गुन्हे दाखल करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

  निवेदनावर नवाब पठाण, नितेश इंगळे, अनिल नळेगावकर, जिंदाशाह फकीर, मनीषा पाटील, फातिमा शेख, माजी सरपंच बाळासाहेब कणसे, सुफीया शेख, यास्मिन खान आदींची स्वाक्षरी आहे. या आंदोलनाला  ग्रामस्थ आकाश मुंगळे, बाळासाहेब माने, वसीम शेख, सलमान शेख, बालाजी माने, हमीद शहा, श्रीकृष्ण खापरे, खलील शेख, गौस बौडीवाले, अतिक सय्यद, सोमनाथ गवळी, नितीन खापरे यांनी पाठिंबा दिला आहे.
 

From around the web