तुळजापुरात सार्वजनिक ठिकाणी भांडण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
तुळजापूर : चिंचोली, ता. तुळजापूर येथील- दिपक क्षिरसागर व राजु क्षिरसागर हे दोघे दि. 19.09.2022 रोजी 14.45 वा. सु. तुळजापूर येथील जुने बस स्थानकात आपापसात भांडणे करुन मोठमोठ्याने आरडाओरड करत असताना तुळजापूर पो.ठा. च्या पथकास मिळुन आले. यावर तुळजापूर पो.ठा. चे पोलीस अंमलदार- ज्ञानेश्वर माळी यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद दोघांविरुध्द भा.दं.सं. कलम- 160 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या मद्यपींवर गुन्हा दाखल
येरमाळा : येरमाळा येथील- सिध्देश्वर आच्युतराव बारकुल व कृष्णा सोमनाथ बारकुल हे दोघे दि. 19.09.2022 रोजी 16.10 वा. सु. येरमाळा बस स्थानकासमोर मद्यधुंद अवस्थेत परिसरातील नागरीकांना मोठमोठ्याने शिवीगाळ करुन सार्वजनिक शांततेचा भंग करीत असताना येरमाळा पोलीस ठाण्याच्या पथकास आढळले. यावरुन येरमाळा पो.ठा. चे पोलीस अंमलदार- नितीन पाटील यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद दोघांविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 85 (1) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.