उस्मानाबाद जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प  - आ कैलास पाटील 

अर्थसंकल्पात उस्मानाबादला काय मिळालं ?  आ. राणा जगजितसिंह पाटील
 
ajit
विकासाची उंची गाठणारा अर्थसंकल्प - खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर

उस्मानाबाद - विधानसभेत आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार  यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी विविध घोषणा केल्या आहेत. 'विकासाची पंचसूत्री' मांडल्याचा दावा करत अजित पवारांनी  सव्वाचार लाख कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थनासकंल्पाचे शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी स्वागत केले आहे तर भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी टीका केली आहे तर विकासाची उंची गाठणारा अर्थसंकल्प आहे असे खा.  ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी म्हटले आहे.

उस्मानाबाद जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प  - आ कैलास पाटील 

d

पहिल्यांदाच राज्य अर्थसंकल्पामध्ये जिल्ह्याला भरीव निधी मिळाला आहे, महाविकास आघाडी सरकारने जिल्ह्याच्या विकासाला मोठी चालना दिली असुन यामध्ये गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या प्रश्नाची सोडवणुक सरकारच्या माध्यमातुन होत आहे. कृष्णा मराठवाडा प्रकल्पाच्या कामासाठी तब्बल सातशे कोटी रुपये तर वैद्यकीय महाविद्यालयासाठी 94 कोटी रुपयाचा निधी देण्यात आला आहे.हा निधी प्रशासकीय खर्चासाठी वापरता येणार आहे.  जिल्ह्यातील असेलेल्या पाझर तलावाचे रुपांतर आता साठवण तलावामध्ये करुन जिल्ह्याच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. 

मराठवाड्यातील विशेषत: जिल्ह्याचे प्रमुख पिक असलेल्या सोयाबीनची उत्पादकता वाढावी यासाठी देखील भरीव निधीची उपलब्धता करण्यात आली आहे.2022-23 वर्षासाठी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातुन फळबागाना प्रोत्साहन देण्यात आले यामध्ये आता केळी,द्राक्ष व ड्रॅगन फ्रुटचा समावेश करण्यात आला आहे.त्यासाठी एक लाख हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट ठेवण्यात आले.परभणी कृषी विद्यापीठाच्या संशोधनासाठी पन्नास कोटी रुपयाची तरतुद करण्यात आली त्याचाही चांगला परिणाम शेतकऱ्यांना होणार असल्याचे आमदार कैलास पाटील यानी म्हटले आहे.

महात्मा ज्योतीबा फुले कर्जमुक्ती योजनेतंर्गत प्रोत्साहनपर अनुदानाची प्रतिक्षा शेतकऱ्यांना होती,त्याचीही पुर्तता अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली असुन शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान जाहीर करण्यात आले आहे.राज्यात सौरऊर्जा प्रकल्पातुन 577 मेगावॅट वीज निर्माण करण्यात येणार आहे,त्यामध्ये जिल्ह्याच्या कौडगाव प्रकल्पाचा समावेश केला असुन त्यालाही चालना मिळणार आहे. शेततळ्यांसाठीचे ५० हजार रुपयांचे अनुदान आता ७५ हजार रुपये करण्यात आले आहे. राज्यातील ६० हजार कृषी पंपांना वीज जोडणी दिली जाणार आहे.कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकासाला दिशा देणारा अर्थसंकल्प म्हणुन याकडे पाहता येईल असे कैलास घाडगे पाटील यानी म्हटले आहे.

-----------------------------

अर्थसंकल्पात उस्मानाबादला काय मिळालं ? - आ. राणा जगजितसिंह पाटील 

kk

ठाकरे सरकारच आजचं अर्थसंकल्पीय भाषण दिशाहीन असल तरी खुप विस्तृत झालं, हे आपण मान्य करूच परंतु यातून उस्मानाबादकरांना विशेष काय मिळाल? हा खरा प्रश्न आहे

राज्यातील अनेक प्रकल्पांचा भाषणात उल्लेख झाला, मात्र उस्मानाबादकरांसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्ग, मराठवाडा वॉटर ग्रीड, महिला रुग्णालय विस्तारीकरण, तुळजापूर तीर्थक्षेत्राचा प्रशाद  योजनेमध्ये समावेश व टेक्निकल टेक्स्टाईल पार्क या प्रकल्पांचा साधा उल्लेखही झाला नाही.

राज्यात इतर ठिकाणी १०० खाटांच्या नवीन महिला रुग्णालये मंजूरीच्या घोषणा आज झाल्या, मात्र नितांत आवश्यकता असताना, अनेक वर्षाची मागणी असूनही उस्मानाबाद येथील महिला रुग्णालय विस्तारीकरणाचा सरकारला पूर्णतः विसर पडला. महिलांच्या आरोग्या विषयी महाविकास आघाडी सरकारची एवढी अनास्था अत्यंत दुर्भाग्यपूर्ण असून याहून अधिक अर्थसंकल्पावर काय बोलणार?

शिवसेनेचे ३ आमदार व १ खासदार निवडुन दिल्या नंतर ठाकरे सरकार यावर्षी तरी न्याय करेल, ही जिल्हावासियांची अपेक्षा पुन्हा एकदा फोलच ठरली. यावर उल्लेखनीय बाब म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री देखील शिवसेनेचेच आहेत. हे सर्वजन त्यांचे कर्तव्य बजावण्यात असमर्थ दिसतात व ही आपल्यासाठी मोठी  चिंतेची बाब आहे. 

---------------------

विकासाची उंची गाठणारा अर्थसंकल्प - खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर

g

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासुन नैसर्गिक आपत्ती व कोरोनाने डोक वर काढले होते. सरकारने तशा काळातही सामान्य लोकांच्या गरजा पुर्ण करण्याचे मोठ काम केले आहे.यंदा त्यातुन काहीसा दिलासा राज्याला मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने विकासाला दिशा देणारा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. जिल्ह्याचा विचार केला तर विकासापासुन कोसोदुर गेलेल्या जिल्ह्याला पुन्हा विकासाच्या प्रक्रियेत सामावुन घेण्याचा पहिल्यांदाच एखाद्या सरकारने केल्याचा दावा खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यानी केला आहे. 

जिल्ह्याच्या सिंचनाचा प्रकल्प लवकर पुर्ण होण्यासाठी महाविकास आघाडीच्या सरकारने गेल्या तीन वर्षापासुन भरीव निधी दिला आहे. यंदा या प्रकल्पाच्या कामासाठी सातशे कोटीचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्याचबरोरीने जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाचे असणारे वैद्यकीय महाविद्यालय सूरु होण्यासाठी या सरकारनेच पुढाकार घेतला. नुसती मंजुरीच नाही तर ते शासनाच्या निधीतुन उभा करण्याचा धाडसी निर्णय सरकारने घेतला. घेतलेल्या निर्णयाशी प्रामाणिक राहुन त्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. प्रशासकीय खर्चासाठी 94 कोटी रुपये मंजुर केला आहे. या शिवाय सौर उर्जा निर्मीतीसाठी कौडगाव येथील प्रकल्पाचा देखील समावेश करण्यात आला असुन तिथेही आता विजेची निर्मीती करण्याचे धोरण शासनाने जाहीर केले आहे. राज्याच्या विविध भागासाठी परिपुर्ण ठरलेला हा अर्थसंकल्प जिल्ह्यासाठी तर वरदान ठरणार असल्याची भावना खासदार ओमराजे निंबाळकर यानी व्यक्त केली. 

शेतकऱ्यांचा विचार केला तर त्यांच्यासाठी आता सिंचनाचा मोठा मार्ग मोकळा करुन दिला आहे. पाझर तलावाचे रुपांतर साठवण तलावामध्ये करण्यात आल्याने मोठा दिलासा मिळणार आहे. कर्जमाफी देताना वेळेवर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळावे अशी मागणी होती, पण कोरोनाच्या संकटामुळे ती पुर्ण झाली नव्हती. मात्र या अर्थसंकल्पामध्ये त्यालाही मंजुरी देऊन शेतकऱ्यांना आता पन्नास हजार रुपयाचे अनुदान मिळणार आहे.

From around the web