उस्मानाबाद जिल्ह्यात २३ रोजी ९८ कोरोना पॉजिटीव्ह, २ मृत्यू 

 
corona

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.  जिल्ह्यात आज २३ जून ( बुधवार ) रोजी ९८  जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ७४  रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात दोन रुग्णाचा मृत्यू झाला. 

उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ५७ हजार ९६९  रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ५५ हजार ७३२  रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १३६९ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ८६८  झाली आहे.

From around the web