उस्मानाबाद जिल्ह्यात १९ रोजी ९१ कोरोना पॉजिटीव्ह , ५ मृत्यू 

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्ण झाले कमी, पण मागील मृत्यूची नोंद घेणे सुरूच.... 
 
corona

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना दिवसेंदिवसहद्दपार होत आहे, मात्र मागील काळात झालेल्या मृत्यूची मागील एक महिन्यापासून नोंद होत असल्याने जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. आरोग्य विभागाने मृत्यूचे आकडे का लपविले, बेजबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई  होणार  का ? याबाबत प्रश्न विचारला जात आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात आज १९ जून ( शनिवार ) रोजी ९१ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ११८  रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात एकाचाही मृत्यू झालानाही मात्र  मागील काही दिवसातील ५  मृत कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे. 


उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ५७ हजार ६९९  रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ५५ हजार ३४२   रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १३६३  रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ९९४ झाली आहे.

आकडेवारी लपविली 

गेल्या एक  महिन्यापासून मागील मृत्यूची दररोज किमान ४ ते ६ रुग्णाची नोंद होत आहे. एकीकडे कोरोना रुग्ण दोनशेच्या आत आले असताना, मागील मृत्यू नेमके  कुठून येत आहेत , मागील काळात आरोग्य विभागाने मृत्यूचे आकडे लपविले होते का ? असा प्रश्न विचारला जात आहे. 

मागील महिन्यात दररोज २० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू होत होता, तेव्हा आरोग्य विभागाने मृत्यूचे आकडे लपविले होते आणि आता मृत्यू संख्या कमी झाल्यानंतर दररोज मागील मृत्यूची नोंद करण्यात येत आहे. मागील मृत्यू काय ते एकदाच नोंद करा आणि एकदाची आकडेवारी संपवा, अशी संतापजनक मागणी होत आहे. 

From around the web