उस्मानाबाद जिल्ह्यात २८ एप्रिल रोजी ८७२ पॉजिटीव्ह, ११ मृत्यू
जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ६७६४
Apr 28, 2021, 20:56 IST
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे.आज २८ एप्रिल ( बुधवार ) रोजी तब्बल ८७२ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ४६६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात ११ कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ३६ हजार ६६५ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी २९ जार १६ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ८८५ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ६७६४ झाली आहे.