उस्मानाबाद जिल्ह्यात १९ जुलै रोजी ८५ कोरोना पॉजिटीव्ह
Jul 19, 2021, 19:50 IST

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज १९ जुलै ( सोमवार ) रोजी ८५ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ४१ रुग्ण बरे होऊन घरी परतले.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ६३ हजार १५६ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ६० हजार ५३६ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १३९१ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ७२० झाली आहे.
मागील काळात झालेल्या ५०९ मृत्यूची अखेर पोर्टलवर नोंद करण्यात आली आहे. त्यात जिल्हा बाहेरील रुग्णालयात व जिल्ह्याबाहेर स्थायिक झालेल्या ३०६ ,कोविड बरा झाल्यानंतर मृत्यू झालेल्या ९८ आणि इतर कारणामुळे मृत्यू झालेल्या १०५ जणांचा समावेश आहे.