उस्मानाबाद जिल्ह्यात २६ जुलै रोजी ८३  कोरोना पॉजिटीव्ह, दोन मृत्यू 

 
corona

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज २६ जुलै  (सोमवार ) रोजी ८३  जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ६८  रुग्ण बरे होऊन घरी परतले, तसेच दिवसभरात दोन रुग्णाचा मृत्यू झाला. 


उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ६३ हजार ५८५  रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ६० हजार ९०६  रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १४११ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ७५३  झाली आहे.

मागील काळात झालेल्या ५१५ मृत्यूची अखेर पोर्टलवर नोंद करण्यात आली आहे. त्यात जिल्हा बाहेरील रुग्णालयात व जिल्ह्याबाहेर स्थायिक झालेल्या ३१० ,कोविड बरा  झाल्यानंतर मृत्यू झालेल्या १०० आणि इतर कारणामुळे मृत्यू झालेल्या १०५ जणांचा समावेश आहे.


कोविड लसींच्या दोन्ही डोसचे  एक लाख तर एका डोसचे साडेतीन लाख लाभार्थी
 
कोविड-19 महामारीपासून बचावासाठी प्रतिबंधक लसीकरण हा अत्यंत महत्वाचा उपाय सिध्द होत आहे.कोविड लसीकरण दि.26 जानेवारी 2021 पासून सुरु झाल्यानंतर आजतागायत उस्मानाबाद जिल्हयामध्ये एकूण 4 लाख 44 हजार 669 लसीकरण झाले आहे.त्यापैकी 3 लाख 42 हजार 690 लाभार्थ्यांना पहिला डोस देण्यात आलेला आहे.दि.26 जुलै 2021 रोजी उस्मानाबाद मधील कोविड लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लाभार्थ्यांची संख्या एक लाखाच्या पुढे गेली आहे.
उस्मानाबाद मधील एक लाख एक हजार 979 लाभार्थ्यांचे कोविड लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत.हा एक चांगला योगायोग दिसून आला आहे.कारण याच दिवशी महाराष्टामधील कोविड लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लाभार्थ्यांची संख्याही एक कोटीच्या पुढे गेली आहे.सध्या मिळत असलेल्या लस साठयापेक्षा अधिक लस प्राप्त झाल्यास उस्मानाबादमधील लाभार्थ्यांचे संपूर्ण लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करता येईल,असे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

d

d

d

d

sd

From around the web