उस्मानाबाद जिल्ह्यात ८ हजार 737 जणांना कोरोना  लस देण्यात येणार

कोरोना प्रतिबंध लस सुरक्षित असल्याने भिती बाळगू नये: जिल्हधिकारी 
 
उस्मानाबाद जिल्ह्यात ८ हजार 737 जणांना कोरोना  लस देण्यात येणार

  उस्मानाबाद -कोरोना लढ्याचा आज महत्वाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे.आपणास जिल्हयातील दहा हजार पन्नास लसी उपलब्ध झाल्या आहेत. कोविन अॅपवर  नोंदणी केलेल्या आठ हजार 737 जणांना लस देण्यात येणार आहे. जिल्ह्यात प्रथम तीन केंद्रावर लस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ही कोरोना प्रतिबंधलस अत्यंत सुरक्षित असल्याने तिच्याबाबत भिती बाळगू नये,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज येथे केले.

लातूर येथील आरोग्‍य उपसंचालक यांच्या कार्यालयाकडून काल रात्री या लसीचा साठा उस्मानाबादमध्ये दाखल झाला आहे.त्यांची जि.प. च्या इमारतीत सध्या शासनाच्या निर्देशाचे पालन करून साठवणूक केली आहे.त्या ठिकाणी आज सकाळी जिल्हाधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली.तेव्हा ते बोलत होते.यावेळी जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड, अपर जिल्हाधिकारी श्रीमती रूपाली डंबे-आवले,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.ए.व्ही. वडगावे,जिल्हा लसीकरण तथा बाल आरोग्य अधिकारी डॉ.कुलदीप मिटकरी आदी उपस्थित होते.

 कोरोना आजाराने अनेक दिवसांपासून हैरान असलेल्या जनतेस केंद्र शासन व राज्य शासनाच्यावतीने काल दि 13 जानेवारी 2021 कोविडशिल्ड लस जिल्हास्तरावर प्राप्त झालेली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अजून पूर्णपणे संपलेला नाही.जनतेने काळजी घेण्याची आवश्यकता आहे. यात मास्क वापरणे,सुरक्षित अंतर ठेवणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, सॅनिटाझरचा वापर करणे,हात स्वच्छ धुणे या बाबी आवश्यक आहेत.कोविडशिल्ड लसीकरणामुळे जनतेत आंनदीमय वातावरण होईल,असा विश्र्वास कौस्तभ दिवेगावकर यांनी व्यक्त केला आहे.

जिल्हास्तरावर पहिल्या टप्प्यात कोविडशिल्ड लस चे 10 हजार 50 डोस प्राप्त झाले आहेत. शासकीय व खाजगी संस्थेतील आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणारआहे.यासाठी जिल्ह्यात तीन ठिकाणी लसीकरण केंद्र स्थापन करण्यात आले आहेत.यामध्ये जिल्हा रूग्णालय,उस्मानाबाद.उपजिल्हा रुग्णालय,तुळजापूर.उपजिल्हा रुग्णालय,उमरगा येथे हे केंद्र स्थापन करण्यात आली आहेत.या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ दि.16 जानेवारी-2021 रोजी शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार करण्यात येणार आहे,अशी माहिती डॉ.वडगावे यांनी दिली आहे.यावेळी श्री.शरद मुंडे,श्री.व्ही. के.शेळगावकर (शितसाखळी तंत्रज्ञ),श्री. डी. सी.धोत्रे औषध निर्माण अधिकारी,श्री.अर्जुन लाकाळ जिल्हाविस्तार व माध्यम अधिकारी उपस्थित होते.

From around the web