उस्मानाबाद जिल्ह्यात २७ जुलै रोजी ७४ कोरोना पॉजिटीव्ह, दोन मृत्यू
Updated: Jul 27, 2021, 18:45 IST

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज २७ जुलै ( मंगळवार ) रोजी ७४ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ६९ रुग्ण बरे होऊन घरी परतले, तसेच दिवसभरात दोन रुग्णाचा मृत्यू झाला.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ६३ हजार ६५९ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ६० हजार ९७५ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १४१३ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ७५४ झाली आहे.
मागील काळात झालेल्या ५१७ मृत्यूची अखेर पोर्टलवर नोंद करण्यात आली आहे. त्यात जिल्हा बाहेरील रुग्णालयात व जिल्ह्याबाहेर स्थायिक झालेल्या ३१२ ,कोविड बरा झाल्यानंतर मृत्यू झालेल्या १०० आणि इतर कारणामुळे मृत्यू झालेल्या १०५ जणांचा समावेश आहे.