उस्मानाबाद जिल्ह्यात २६ एप्रिल रोजी ७२० पॉजिटीव्ह, १७ मृत्यू
जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ६२७६
Updated: Apr 26, 2021, 22:06 IST

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे.आज २६ एप्रिल ( सोमवार ) रोजी तब्बल ७२० जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ५८५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात १७ कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ३५ हजार ६५ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी २७ जार ९२० रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ८६९ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ६२७६ झाली आहे.