उस्मानाबाद जिल्ह्यात ३० जुलै रोजी ७२ कोरोना पॉजिटीव्ह, एक मृत्यू
Fri, 30 Jul 2021

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. जिल्ह्यात आज ३० जुलै (शुक्रवार) रोजी ७२ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ६९रुग्ण बरे होऊन घरी परतले, तसेच एका रुग्णाचा मृत्यू झाला.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ६३ हजार ९०३ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ६१ हजार १५५ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १४१५ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ८१४ झाली आहे.
मागील काळात झालेल्या ५१९ मृत्यूची अखेर पोर्टलवर नोंद करण्यात आली आहे. त्यात जिल्हा बाहेरील रुग्णालयात व जिल्ह्याबाहेर स्थायिक झालेल्या ३१४ ,कोविड बरा झाल्यानंतर मृत्यू झालेल्या १०० आणि इतर कारणामुळे मृत्यू झालेल्या १०५ जणांचा समावेश आहे.