उस्मानाबाद जिल्ह्यात २२ एप्रिल रोजी ७१९ पॉजिटीव्ह,२१ मृत्यू
जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ६०५७
Apr 22, 2021, 21:35 IST

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे.आज २२ एप्रिल ( गुरुवार ) रोजी तब्बल ७१९ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ६८० रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात २१ कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. गेल्या ९ दिवसात १५८ जणांचा मृत्यू झाल्याने घबराट पसरली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ३२ हजार २४७ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी २५ जार ५१० रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ८०० रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ६०५७ झाली आहे.