उस्मानाबाद जिल्ह्यात २३ एप्रिल रोजी ७१९ पॉजिटीव्ह,१६ मृत्यू
जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ६१९५
Apr 23, 2021, 21:43 IST

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे.आज २३ एप्रिल ( शुक्रवार ) रोजी तब्बल ७१९ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ८८१ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात १६ कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ३२ हजार ९६६ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी २५ जार ९९५ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ८१६ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ६१९५ झाली आहे.