उस्मानाबाद जिल्ह्यात २६ रोजी ७० कोरोना पॉजिटीव्ह, १ मृत्यू
Jun 26, 2021, 20:44 IST

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. जिल्ह्यात आज २६ जून ( शनिवार ) रोजी ७० जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ११ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू झाला.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ५८ हजार १६५ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ५६ हजार ५४ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १३७२ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ७३९ झाली आहे.