उस्मानाबाद जिल्ह्यात २१ ऑगस्ट रोजी ६८ कोरोना पॉजिटीव्ह
जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ६९२
Aug 21, 2021, 19:10 IST
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज २१ ऑगस्ट ( शनिवार) रोजी ६८ कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ७६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ६५ हजार ५७८ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ६२ हजार ९०६ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १४४७ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ६९२ झाली आहे.
मागील काळात झालेल्या ५३३ मृत्यूची अखेर पोर्टलवर नोंद करण्यात आली आहे. त्यात जिल्हा बाहेरील रुग्णालयात व जिल्ह्याबाहेर स्थायिक झालेल्या ३२६ ,कोविड बरा झाल्यानंतर मृत्यू झालेल्या १०१ आणि इतर कारणामुळे मृत्यू झालेल्या १०६ जणांचा समावेश आहे.