उस्मानाबाद जिल्ह्यात २१ एप्रिल रोजी ६६७ पॉजिटीव्ह,२३ मृत्यू
जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ५९१९
Updated: Apr 21, 2021, 20:38 IST

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे.आज २१ एप्रिल( बुधवार ) रोजी तब्बल ६६७ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ७११ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात २३ कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. गेल्या आठ दिवसात १३७ जणांचा मृत्यू झाल्याने घबराट पसरली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ३१ हजार ५२८ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी २४ जार ८३० रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ७७९ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ५९१९ झाली आहे.