उस्मानाबाद जिल्ह्यात १९ एप्रिल रोजी ६६२ पॉजिटीव्ह,१० मृत्यू
जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ६००८
Mon, 19 Apr 2021

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे.आज १९ एप्रिल ( सोमवार ) रोजी तब्बल ६६२ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ५०८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात १० कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. गेल्या सहा दिवसात ९३ जणांचा मृत्यू झाल्याने घबराट पसरली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ३० हजार २१६ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी २३ हजार ४७३ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ७३५ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ६००८ झाली आहे.