धाराशिव शहर मंडळातील 65 फेरफार मंजूर

जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: घेतली फेरफार अदालत
 
s

धाराशिव :-  तलाठी कार्यालय धाराशिव  येथे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार महाराजस्व अभियान अंतर्गत फेरफार अदालत व उस्मानाबाद तालुक्यातील स्वतंत्र सैनिकांच्या अडीअडचणी बाबत मेळावा आयोजित करण्यात आला. 

          यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे, तहसिलदार डॉ. शिवानंद बिडवे, मंडळ अधिकारी अनिल तिर्थकर, तलाठी श्रीधर माळी, श्रीनिवास पवार, प्रशांत देशमुख उपस्थित होते. या मेळाव्यासाठी  उस्मानाबाद तालुक्यातील स्वातंत्र सैनिकांच्या ज्या काही अडचणी आहेत त्याबाबत स्वतः जिल्हाधिकारी यांनी आढावा घेऊन त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यामध्ये स्वातंत्र्यसैनिकांकडून त्यांच्या मागण्यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

d

तसेच प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये फेरफार आदालत घेण्याबाबत व सर्व प्रलंबित फेरफार त्यादिवशी निकाली काढण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या परिपत्रकानुसार आज उस्मानाबाद तालुक्यातील सर्व मंडळांमध्ये फेरफार अदालत घेण्यात आली. उस्मानाबाद शहर या मंडळामध्ये फेरफार आदालत या कार्यक्रमांमध्ये जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे यांनी स्वतः उपस्थित राहून सर्व शेतकरी खातेदार यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि सर्व फेरफार आज रोजी निकाली काढण्यात आले व निकाली काढलेल्या फेरफारचे नक्कल प्रत व सातबारा संबंधित शेतकरी खातेदार व प्लॉट धारक यांना वितरित करण्यात आला. या फेरफार अदालतमध्ये उस्मानाबाद शहर मंडळातील एकूण 65 फेरफार मंजूर करण्यात आले.

From around the web