उस्मानाबाद जिल्ह्यात १६ जुलै रोजी ५४ कोरोना पॉजिटीव्ह, दोन मृत्यू
मागील काळात झालेल्या ५०६ मृत्यूची अखेर पोर्टलवर नोंद
Fri, 16 Jul 2021

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज १६ जुलै ( शुक्रवार ) रोजी ५४ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ९१ रुग्ण बरे होऊन घरी परतले .तसेच दिवसभरात दोन रुग्णाचा मृत्यू झाला. तसेच मागील काळात झालेल्या ५०६ मृत्यूची अखेर पोर्टलवर नोंद करण्यात आली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ६२ हजार ९५२ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ६० हजार ४०४ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १३८५ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ६५७ झाली आहे.
मागील काळात झालेल्या ५०६ मृत्यूची अखेर पोर्टलवर नोंद करण्यात आली आहे. त्यात जिल्हा बाहेरील रुग्णालयात व जिल्ह्याबाहेर स्थायिक झालेल्या ३०५ ,कोविड बरा झाल्यानंतर मृत्यू झालेल्या ९७ आणि इतर कारणामुळे मृत्यू झालेल्या १०४ जणांचा समावेश आहे.