उस्मानाबाद जिल्ह्यात १९ ऑगस्ट रोजी ५१ कोरोना पॉजिटीव्ह
जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ७२८
Aug 19, 2021, 19:44 IST

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज १९ ऑगस्ट ( गुरुवार) रोजी ५१ कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ८६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत .
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ६५ हजार ४४० रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ६२ हजार ७३६ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १४४५ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ७२८ झाली आहे.
मागील काळात झालेल्या ५३१ मृत्यूची अखेर पोर्टलवर नोंद करण्यात आली आहे. त्यात जिल्हा बाहेरील रुग्णालयात व जिल्ह्याबाहेर स्थायिक झालेल्या ३२४ ,कोविड बरा झाल्यानंतर मृत्यू झालेल्या १०१ आणि इतर कारणामुळे मृत्यू झालेल्या १०६ जणांचा समावेश आहे.