उस्मानाबाद जिल्ह्यात ३ सप्टेंबर रोजी ४९ कोरोना पॉजिटीव्ह
Fri, 3 Sep 2021

उस्मानाबाद -जिल्ह्यात आज ३ सप्टेंबर ( शुक्रवार ) रोजी ४९ कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ४३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत .
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ६६ हजार १९६ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ६३ हजार ६५१ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १४६९ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ५३२ झाली आहे.
मागील काळात झालेल्या ५४४ मृत्यूची अखेर पोर्टलवर नोंद करण्यात आली आहे. त्यात जिल्हा बाहेरील रुग्णालयात व जिल्ह्याबाहेर स्थायिक झालेल्या ३३७ ,कोविड बरा झाल्यानंतर मृत्यू झालेल्या १०१ आणि इतर कारणामुळे मृत्यू झालेल्या १०६ जणांचा समावेश आहे.