उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी ४८.०२ टक्के मतदान

६७८४२ पैकी ३२५७६ जणांनी बजावला मतदानाचा हक्क
 
sd

उस्मानाबाद - महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यात नावलौकीक प्राप्त असलेल्या उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी दि.१९ नोव्हेबर रोजी ६७ हजार ८४२ मतदारांपैकी ३२ हजार ५७६ आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. या मतदानाची एकूण सरासरी ४८.०२ टक्के असून दोन्ही पॅनलच्या उमेदवारांचे भवितव्य मतदारांनी मतपेटीतून बंद केले आहे. मतदारांच्या भवितव्याचा निकाल दि.२० नोव्हेंबर रोजी करणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

 या निवडणुकीत नागदे-मोदाणी पॅनलचे उमेदवार नागदे-मोदाणी पॅनलमध्ये उस्मानाबाद तालुका गटातून विश्वास शिंदे, वसंतराव नागदे, आशिष मोदाणी, उर्वरित उस्मानाबाद जिल्हा गटात तानाजी चव्हाण, सुभाष गोविंदपूरकर, प्रदीप पाटील, उस्मानाबाद जिल्ह्याच्या बाहेरील महाराष्ट्र गटात वैजिनाथ शिंदे, निवृत्ती भोसले, सुभाष धनूरे, महाराष्ट्र बाहेरील गटात नंदकूमार नागदे, महिला गटात पंकजा पाटील, करूणा पाटील, मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती गटातून राजीव पाटील निवडणूक रिंगणात उतरले होते. 

 भाजप पुरस्कृत व अपक्ष उमेदवार चिन्हासह पुढीलप्रमाणे - उस्मानाबाद तालुका गट सुधीर पाटील, विनोद गपाट, पिराजी मंजुळे मोहित उस्मानाबाद जिल्हा गट विकास कोंडेकर (गॅस सिलेंडर) व सिद्धेश्वर पाटील (केटली, अपक्ष) तर महादेव लोकरे, उस्मानाबाद जिल्हा बाहेरील महाराष्ट्र गट अभिषेक आकनगिरे, दिलीप देशमुख, नितीन कवठेकर(गॅस सिलेंडर), नरोद्दीन काझी (पतंग, अपक्ष),  महाराष्ट्र बाहेरील गट सीताराम जाधव, आर्थिक दुर्बल गट पांडुरंग धोंगडे (प्रेशर कुकर, अपक्ष), अनुसूचित जाती गट यशवंत पेठे, महिला गट सुचिता काकडे, सरिता शिंदे (गॅस सिलेंडर) आदी उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला दि.२० नोव्हेंबर रोजी होणार आहे.

From around the web