आयपीएल क्रिकेट मॅचच्या सट्टा (बेटींग) प्रकरणी कारणे दाखवा नोटीस 

 
crime

धाराशिव -  आयपीएल क्रिकेट मॅचच्या सट्टा (बेटींग) प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव आणि पोलीस उपनिरीक्षक एस. एस. ओहोळ यांना विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी २१ जून रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली असून, या नोटीस मध्ये कडक ताशेरे ओढले आहेत.


मुंबईच्या दहिसर येथील भव्य चैतन्य दवे यांनी 6 मे धाराशिव शहरातील बस स्थानक जवळील हॉटेल प्रतिभा एक्झक्युटिव्ह लॉजमध्ये मुंबई इ्ंडियन्स विरुध्द चेन्नई आणि रॉयल चॅलेजर्स बेंगलोर विरुध्द डेल्ही कॅपीटल्स या दोन संघादरम्यान चालु असलेल्या क्रिकेट मॅचवर सट्टा (बेटींग) जुगार चालविला. सट्टा चालविण्या करीता नागपूर येथील आशिष नेवारे यांच्याकडून खोटे सांगून त्यांचे आधारकार्ड व सिमकार्ड घेऊन  सिमकार्डचा वापर करुन फोनद्वारे व्हॉटसअपद्वारे क्रिकेट सट्टा चालवला.  प्रतिभा एक्झक्युटिव्ह लॉजमध्ये राहण्याकरीता स्वताची ओळख लपविण्याचे उद्देशाने बनावट आधारकार्ड देऊन फसवणूक केली.धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार हुसेन नसीर खान सय्यद यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कलम 420, 468, 471 सह म.जु.का. क. 4, 5 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


'कारणे दाखवा नोटीस 

आयपीएल क्रिकेट मॅचच्या सट्टा (बेटींग) प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव आणि पोलीस उपनिरीक्षक उपनिरीक्षक एस. एस. ओहोळ यांना विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी २१ जून रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली असून, या नोटीस मध्ये कडक ताशेरे ओढले आहेत

१. या गुन्ह्यातील इतर दहा आरोपी निष्पन्न झालेले असताना, त्यांना अटक करण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत. 
२. आरोपी एम के तथा मिथुन कुबोडिया हा मुंबईत मिळून आलेला असताना, त्यास अटक न करता नोटीस देऊन अभय देण्यात आले. 
३. आरोपी भव्य चैतन्य दवे याच्याकडे असलेले सिमकार्ड कोणाच्या नावावर आहे, हे माहित झाले असतानाही कोणतीही कारवाई नाही. 
४. सदर गुन्हयातील आरोपीविरुद्ध सबळ पुरावा हस्तगत करण्यासाठी काहीएक प्रयत्न करण्यात आलेले नाहीत. 

From around the web