उस्मानाबाद जिल्ह्यात १९ मे रोजी ४४९ पॉजिटीव्ह, ८ मृत्यू
May 19, 2021, 21:37 IST

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज १९ मे ( बुधवार ) रोजी तब्बल ४४९ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ५८४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात ८ कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या घटली आहे पण मृत्युदर कायम आहे. मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे आव्हान आरोग्य विभागापुढे आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ५० हजार ३५२ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ४४ हजार २०४ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ११४० रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ५००८ झाली आहे .