उस्मानाबाद जिल्ह्यात १८ मे रोजी ४०० पॉजिटीव्ह, ११ मृत्यू
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या घटली, पण मृत्युदर कायम !
Tue, 18 May 2021

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज १८ मे ( मंगळवार ) रोजी तब्बल ४०० जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ६९७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात ११ कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या घटली आहे पण मृत्युदर कायम आहे. मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे आव्हान आरोग्य विभागापुढे आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ४९ हजार ९०३ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ४३ हजार ६२० रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ११३२ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ५१५१ झाली आहे .