उस्मानाबाद जिल्ह्यात २१ सप्टेंबर रोजी ३९ कोरोना पॉजिटीव्ह, दोन मृत्यू 

 ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ५०२  
 
corona

उस्मानाबाद - जिल्ह्यात आज २१ सप्टेंबर ( मंगळवार ) रोजी ३९ कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ६६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तसेच गेल्या २४ तासात दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ६६ हजार ६२५ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ६४ हजार ९९  रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १४७१ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ५०२ झाली आहे.

मागील काळात झालेल्या ५५३  मृत्यूची अखेर पोर्टलवर नोंद करण्यात आली आहे. त्यात जिल्हा बाहेरील रुग्णालयात व जिल्ह्याबाहेर स्थायिक झालेल्या ३४४ ,कोविड बरा  झाल्यानंतर मृत्यू झालेल्या १०३ आणि इतर कारणामुळे मृत्यू झालेल्या १०६ जणांचा समावेश आहे.

d

d

d

sd

From around the web