उस्मानाबाद जिल्ह्यात २७ सप्टेंबर रोजी ३६ कोरोना पॉजिटीव्ह, चार मृत्यू
ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ४४१
Sep 27, 2021, 20:07 IST

उस्मानाबाद - जिल्ह्यात आज २७ सप्टेंबर ( सोमवार ) रोजी ३६ कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ३४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच गेल्या २४ तासात चार रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ६६ हजार ८३४ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ६४ हजार३६२ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १४७७ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ४४१ झाली आहे.
मागील काळात झालेल्या ५५४ मृत्यूची अखेर पोर्टलवर नोंद करण्यात आली आहे. त्यात जिल्हा बाहेरील रुग्णालयात व जिल्ह्याबाहेर स्थायिक झालेल्या ३४५ ,कोविड बरा झाल्यानंतर मृत्यू झालेल्या १०३ आणि इतर कारणामुळे मृत्यू झालेल्या १०६ जणांचा समावेश आहे.