उस्मानाबाद जिल्ह्यात २ ऑक्टोबर रोजी ३३ कोरोना पॉजिटीव्ह
ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ३४८
Sat, 2 Oct 2021

उस्मानाबाद - जिल्ह्यात आज २ ऑक्टोबर ( शनिवार ) रोजी ३३ कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ५१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ६६ हजार ९८० रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ६४ हजार ५८८ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १४८५ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ३४८ झाली आहे.
मागील काळात झालेल्या ५५९ मृत्यूची अखेर पोर्टलवर नोंद करण्यात आली आहे. त्यात जिल्हा बाहेरील रुग्णालयात व जिल्ह्याबाहेर स्थायिक झालेल्या ३४७ ,कोविड बरा झाल्यानंतर मृत्यू झालेल्या १०५ आणि इतर कारणामुळे मृत्यू झालेल्या १०७ जणांचा समावेश आहे.