उस्मानाबाद - कळंब विधानसभा मतदारसंघातील दुरुस्तीच्या  कामासाठी 30 कोटी निधी मंजूर 

आ. कैलास घाडगे पाटील यांची माहिती  
 
उस्मानाबाद - कळंब विधानसभा मतदारसंघातील दुरुस्तीच्या कामासाठी 30 कोटी निधी मंजूर

उस्मानाबाद -  उस्मानाबाद: कळंब मतदारसंघातील  दुरुस्तीची कामे अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आली आहेत. 30 कोटी 60 लाखाच्या कामांना मंजुरी मिळाल्याची माहिती मतदारसंघाचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी  दिली आहे. या शिवाय भिकार -सारोळा- आरणी ते खामगाव रोड बांधण्यासाठी दिड कोटी मंजुर करण्यात आले आहेत. 

उस्मानाबाद कळंब मतदारसंघातील मस्सा-मोहा-गोविंदपुर रस्ता सूधारण्यासाठी चार कोटी रुपये,उस्मानाबाद तालुक्यातील पिंप्री गोडाऊन ते राघुचीवाडी रस्ता सूधारणा करणे यासाठी एक कोटी, कळंब ढोकी रस्त्याची कळंब शहरातील काँक्रिट रस्त्यासह सुधारणा करण्यासाठी चार कोटी रुपये मंजुर करण्यात आले आहेत. 

उस्मानाबाद तालुक्यातील बावी ते धारुर रस्त्याची सुधारणा करण्यासाठी तीन कोटी रुपये देण्यात आले आहेत. राज्य मार्ग ते देवधानोरा रस्त्याची सुधारणा करण्यासाठी दोन कोटी रुपये, कळंब मोहा येडशी रस्त्याची सुधारणा करणे एक कोटी रुपये, खेड ते खेडपाटी रस्त्याची सुधारणा करणे 40 लाख रुपये, मंगरुळ गावातील काँक्रिट रस्ता व नाली बांधणे दोन कोटी रुपये, ईटकुर हासेगाव रस्त्याची सुधारणा करणे तीन कोटी 60 लाख रुपये मंजुर करण्यात आले आहेत. उस्मानाबाद शहरातील जिजाऊ चौक ते मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, बार्शी वळण रस्त्यामध्ये काँक्रिट गटार बांधकाम करण्यासाठी चार कोटी रुपयाची तरतुद करण्यात आली आहे. कावळेवाडी गावाजवळ पुलाचे बांधकाम करण्यासाठी एक कोटी 80 लाख रुपये देण्यात येणार आहेत, असेही आ. पाटील यांनी सांगितले. 

From around the web