जलसंधारण विभागामार्फत तीन कोटी 89 लाखांचा निधी मंजूर
उस्मानाबाद - मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत जलसंधारण विभागामार्फत को प बंधारे व पाझर तलाव दुरुस्तीसाठी मतदारसंघासाठी तीन कोटी 89 लाख रुपयाचा निधी मंजुर झाला आहे. मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या सहकार्यामुळे मतदारसंघातील विविध योजनेच्या दूरुस्तीच्या कामे मंजुर झाल्याचे उस्मानाबाद -कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी सांगितले.यामध्ये उस्मानाबाद तालुक्यासाठी 68 लाख 19 हजार रुपये तर कळंब तालुक्यासाठी तीन कोटी 20 लाख रुपये मंजुर झाले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
राज्यातील पुर्ण झालेल्या जलसंधारण योजनापैकी देखभाल व दूरुस्ती आवश्यक असलेल्या योजनाचे परिरक्षण व दुरुस्ती करुन सिंचन क्षमता पुर्नस्थापित व्हावी या दृष्टीने मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना द्वारे राबविण्यात येणार आहे. मराठवाड्यासाठी तीस कोटीचा निधी योजनाच्या दूरुस्तीसाठी झालेला आहे. त्यातील उस्मानाबाद कळंब मतदारसंघासाठी तीन कोटी 89 लाख रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे. 39 योजनाच्या कामाची दूरुस्ती झाल्यास सिंचन क्षेत्र वाढेल व पाणीसाठा पुनर्स्थापित होणार असल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार असल्याचा विश्वास आमदार घाडगे पाटील यांनी व्यक्त केला आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील पाझर तलावाची दूरुस्ती झालेली गावामध्ये आळणी,तावरजखेडा, घाटंग्री, वडगाव सिध्देश्वर यांचा समावेश असणार आहे. कळंब तालुक्यातील पाझर तलावाची दूरुस्ती असलेल्या गावामध्ये गौर, बोरगाव बु, शेळका धानोरा यांचा समावेश असणार आहे. तर कोल्हापुरी पध्दतीच्या बंधाऱ्याची दूरुस्ती होणार असलेल्या गावामध्ये अंदोरा दोन बंधारे, इटकुर क्रमांक चारचा बंधारा, सापनाई दोन बंधारे, एरंडगाव दूरस्तीसह गेट पुरवठा, सौंदणा दूरुस्तीसह गेट, मोहा दूरुस्तीसह पडदी बांधकाम, नागुलगाव, बोरगाव बु, एकुरका दुरस्तीसह पडदी बांधकाम करण्यात येणार आहे.
पाडोळी बंधारा क्रमांक चार, पिंपरी (शि)दूरुस्तीसह पडदी बांधकाम, दहिफळ दूरस्तीसह पडदी बांधकाम, गौर दूरुस्तीसह पडदी बांधकाम,देवधानोरा दूरुस्तीसह पडदी बांधकाम, मंगरुळ दूरुस्तीसह पडदी बांधकाम करंजकल्ला दूरुस्तीसह पडदी बांधकाम, अंदोरा दूरुस्तीसह पडदी बांध बांधकाम, पाथर्डी क्रमांक दोनचा बंधारा, शेळका धानोरा क्रमांक चारचा बंधारा,बहुला दुरस्ती, बाभळगाव दुरुत्ती, उपळाई दूरुस्तीसह गेटपुरवठा करणे, संजितपुर दूरुस्तीसह गेटपुरवठा करणे, शेळका धानोरा दूरुस्तीसह गेट पुरवठा करणे, कोथळा क्रमांक दोनचा बंधारा, खडकी दूरुस्ती, गौर क्रमांक सहा बंधारा पडदी बांधकाम करणे,भाटसांगवी दुरुस्ती आदी योजनाच्या कामाना मंजुरी मिळाली आहे.
जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या पुढाकारामुळे या कामाना निधी मिळणार आहे. माजी मंत्री आमदार प्रा. तानाजी सावंत, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनीही या कामासंदर्भात पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यानी हा निधी मंजुर केला त्याबद्दल आमदार घाडगे पाटील यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.