उस्मानाबाद जिल्ह्यात ३१ मे रोजी २९१ कोरोना पॉजिटीव्ह, ८ मृत्यू 

कोरोना रुग्ण बरे होण्याचे ९२.२८ टक्के तर ‌मृत्यूचे २.२५ प्रमाण टक्के
 
corona

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज ३१ मे (सोमवार ) रोजी तब्बल २९१ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ४९० रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात ८ कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 


उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या घटली असून, त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी थोडासा सुस्कारा सोडला आहे. मात्र मृत्यूचं प्रमाण रोखणं आरोग्य विभागाच्या समोर एक आव्हान आहे. 


उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ५४ हजार ९४७ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ५० हजार ७०७ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १२४१रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या २९९९ झाली आहे . 

From around the web