उस्मानाबाद जिल्ह्यात १९ सप्टेंबर रोजी २४ कोरोना पॉजिटीव्ह
ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ५३०
Sun, 19 Sep 2021

उस्मानाबाद - जिल्ह्यात आज १९ सप्टेंबर ( रविवार ) रोजी २४ कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ३४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ६६ हजार ५३७ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ६३ हजार ९९८ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १४६७ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ५३० झाली आहे.
मागील काळात झालेल्या ५५२ मृत्यूची अखेर पोर्टलवर नोंद करण्यात आली आहे. त्यात जिल्हा बाहेरील रुग्णालयात व जिल्ह्याबाहेर स्थायिक झालेल्या ३४३ ,कोविड बरा झाल्यानंतर मृत्यू झालेल्या १०३ आणि इतर कारणामुळे मृत्यू झालेल्या १०६ जणांचा समावेश आहे.