उस्मानाबाद जिल्ह्यात २८ सप्टेंबर रोजी २१ कोरोना पॉजिटीव्ह, तीन मृत्यू
ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ४०४
Sep 29, 2021, 00:07 IST

उस्मानाबाद - जिल्ह्यात आज २८ सप्टेंबर ( मंगळवार ) रोजी २१ कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ५३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच गेल्या २४ तासात तीन रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ६६ हजार ८५५ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ६४ हजार ४१५ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १४८० रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ४०४ झाली आहे.
मागील काळात झालेल्या ५५६ मृत्यूची अखेर पोर्टलवर नोंद करण्यात आली आहे. त्यात जिल्हा बाहेरील रुग्णालयात व जिल्ह्याबाहेर स्थायिक झालेल्या ३४६ ,कोविड बरा झाल्यानंतर मृत्यू झालेल्या १०४ आणि इतर कारणामुळे मृत्यू झालेल्या १०६ जणांचा समावेश आहे.