उस्मानाबाद जिल्ह्यात ३ जून रोजी १७९  कोरोना पॉजिटीव्ह, ६ मृत्यू 

कोरोना रुग्ण बरे होण्याचे ९३.६० टक्के तर ‌मृत्यूचे २.२६ प्रमाण टक्के
 
corona

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज ३ जून ( गुरुवार ) रोजी १७९ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ३७७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात ३ कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर मागील काही दिवसातील ३ मृत कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या घटली असून, त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी थोडासा सुस्कारा सोडला आहे. मात्र मृत्यूचं प्रमाण रोखणं आरोग्य विभागाच्या समोर एक आव्हान आहे. 


उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ५५ हजार ५५५ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ५२ हजार १ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १२६२ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या २२९२ झाली आहे.

From around the web