उस्मानाबाद जिल्ह्यात ५ जून रोजी १७७ कोरोना पॉजिटीव्ह, ४ मृत्यू
कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ .३२ टक्के तर मृत्यूचे २.२७ प्रमाण टक्के
Updated: Jun 5, 2021, 20:20 IST
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज ५ जून (शनिवार ) रोजी १७७ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ३१४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात २ कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे तर मागील काही दिवसातील २ मृत कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या घटली असून, अनेक कोरोना सेंटर रिकामे झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी थोडासा सुस्कारा सोडला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ५५ हजार ८९२ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ५२ हजार ७२० रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १२७२ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १९०० झाली आहे.