उस्मानाबाद जिल्ह्यातील ६१ केंद्रावर १६ हजार ७८० जणांना मिळणार लसीचा पहिला व दुसरा डोस 

 
s

उस्मानाबाद - जिल्ह्यातील ४५ वर्षाच्या वरील नागरिक, आरोग्य कर्मचारी व फ्रन्टलाइन वर्कर यांना कोविशिल्ड लसीचा पहिलाडोस दि.२८ मे रोजी निवडक ४६ आरोग्य उपकेंद्रावर तर दुसरा डोस जिल्ह्यातील  २ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, ६ ग्रामीण रुग्णालय, ४ उपजिल्हा रुग्णालय, शासकीय जिल्हा रुग्णालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व पोलिस रुग्णालय उस्मानाबाद या लसीकरण केंद्रावर १६ हजार ७८० जणांना लस दिली जाणार आहे. 

लसीकरणासाठी जाताना नागरिकांनी आपले आधार कार्ड सोबत बाळगणे आवश्यक असून या दिवशी केवळ ४५ वर्ष वयाच्यापुढील नागरिक, आरोग्य कर्मचारी व फ्रन्टलाइन वर्कर यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे. तर ज्या नागरिकांनी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच नागरिकांना दुसरा डोस दिला जाणार असल्याने इतरांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये.

लसीकरण ग्रामीण भागासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात येणार असून यामध्ये तालुकानिहाय लसीकरण केंद्राची नावे पुढील प्रमाणे  - उस्मानाबाद - उपळा (मा), रुईभर, कसबे तडवळा, वडगाव (सि), येवती, अंबेजवळगा, चिखली, भंडारी, पळसप व सांजा तर तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा, होर्टी, नंदगाव, काक्रंबा, तामलवाडी, पिंपळा खुर्द व ईटकळ तसेच उमरगा तालुक्यातील गुंजोटी, बलसुर, माडज, तुरोरी व कदेर तर लोहारा तालुक्यातील मार्डी, होळी, वडगाव गांजा व अचलेर तर कळंब तालुक्यातील खामसवाडी, पानगाव, पाथर्डी, गौर, भाटशिरपुरा, देवळाली, पाडोळी व रांजणी तसेच वाशी तालुक्यातील सरमकुंडी, पिंपळगाव लिंगी व बावी व भूम तालुक्यातील अंतरवली, सुक्टा, देवळाली वरुड व चिंचपूर तसेच परंडा तालुक्यातील सिरसाव, लोणी, डोंजा व वाटेफळ या ग्रामीण भागातील ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रावर ११ हजार ५०० लस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

 तर उस्मानाबाद शहरातील नागरिकांसाठी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, वैराग रोड, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, रामनगर,  पोलिस रुग्णालय (केवळ फ्रन्टलाइन वर्करसाठी), ग्रामीण रुग्णालय मुरूम, ग्रामीण रुग्णालय लोहारा, ग्रामीण रुग्णालय सास्तूर, ग्रामीण रुग्णालय तेर, ग्रामीण रुग्णालय वाशी, ग्रामीण रुग्णालय भूम, उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर, उपजिल्हा रुग्णालय कळंब, उपजिल्हा रुग्णालय परंडा, उपजिल्हा रुग्णालय उमरगा, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद या केंद्रावर ५ हजार २८० लसीकरण करण्यात येणार आहे. या ६१ केंद्रावर सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी लाभार्थ्यांनी लस घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी अथवा बुकिंग करण्याची आवश्यकता नाही. मात्र लसीकरण केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित लाभार्थ्यांपैकी प्रथम आलेल्या लाभार्थ्यांना ऑन स्पॉट नोंदणी पद्धतीने लसीकरण केले जाणार आहे.

 तसेच लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार असून यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. तर ज्या लसीकरण केंद्राच्या ठिकाणी कोविशिल्ड लसीचा पहिला आणि दुसरा असे ‌दोन्ही डोस दिले जाणार आहेत. अशा ठिकाणी दोन्ही लसींच्या लाभार्थ्यासाठी स्वतंत्र नोंदणी व रांगा ठेवण्यात येणार आहेत. तर लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलिस प्रशासनाने गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणामध्ये मदत करावी. त्यामुळे उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविडच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवीत लस द्यावी, असे आवाहन जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी यांनी केले आहे.

From around the web