कळंब तालुक्यातील ५९ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १३५५ अर्ज दाखल

 
कळंब तालुक्यातील ५९ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १३५५ अर्ज दाखल

कळंब  -  कळंब तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा आखाडा आता चांगलाच पेटला असून ५९  ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १३५५ अर्ज दाखल झाले आहेत.सर्वच ग्रामपंचायत  निवडणुकीत दोन ते तीन पॅनल रिंगणात उतरले असून, सर्वच  ठिकाणी अटीतटीच्या लढती होत आहेत. 


कळंब तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतची निवडणूक लागली आहे.या निवडणुकीसाठी १३५५ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर १६ उमेदवाराचे अर्ज बाद झाले असून तालुक्यातील चार ग्रामपंचायत सद्यस्थितीला बिनविरोध निघण्याच्या मार्गावर आहेत.

तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतच्या १८८ प्रभागातील एकूण ४९५ सदस्यांच्या जागेसाठी निवडणूक होणार आहे.या टप्यातील सर्वात मोठी ईटकूरची ग्रामपंचायत असून येथे १५ सदस्य आहेत तर येरमाळा व मंगरूळ येथे १३ सदस्य आहेत.ईटकूर ग्रामपंचायत साठी सर्वाधिक ६६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

कळंब तालुक्यातील आडसुळवाडी,भाटशिरपूरा, दुधळवाडी, आणि लासरा या चार ग्रामपंचायत बिनविरोध निघण्याच्या मार्गावर आहेत.


कळंब तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतच्या निवडणुकी पार पाडण्यासाठी तहसील कार्यालय सज्ज झाले आहे.कळंब तालुक्यातील ५९ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ७७६ कर्मचारी १९४ केंद्राचा भार सांभाळणार आहेत.तर १५ झोनल अधिकारी कार्यरत करण्यात आले आहेत.

From around the web