एमपीएससीच्या परीक्षेला १ हजार २२७ विद्यार्थ्यांनी मारली दांडी

२ हजार ५४० जणांनी दिली परीक्षा
 
एमपीएससीच्या परीक्षेला १ हजार २२७ विद्यार्थ्यांनी मारली दांडी

उस्मानाबाद - सतत राज्यसेवा पूर्व परीक्षा - २०२० अर्थात एमपीएससीची परीक्षा विविध कारणाने तारीख पे तारीख देऊन पुढे ढकलली जात होती. मात्र मागील तारीख पुढे ढकलल्यामुळे राज्यात एकच गोंधळ उडाल्याने याविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले होते. त्यानंतर राज्य सरकारने दि.२१ मार्च रोजी या परीक्षा घेण्याचे निश्चित करून त्या परीक्षा आज रविवार दि.२१ मार्च रोजी घेतल्या गेल्या. 

उस्मानाबाद जिल्ह्यात या परिक्षेसाठी ३ हजार ७६७ विद्यार्थी बसले होते. मात्र त्यापैकी केवळ २ हजार ५४० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर १ हजार २२७ विद्यार्थ्यांनी गैरहजर राहून दांडी मारली. दांडी बहाद्दर विद्यार्थ्यांचे प्रमाण ३२.५७ टक्के असून ते खरोखरच चिंताजनक आहे. या परीक्षेसाठी त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी कोचिंग क्लासेस व स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असलेली विविध प्रकारची महागडी पुस्तके खरेदी करून विद्यार्थ्यांना उपलब्ध देण्यासाठी, रूम भाडे व इतर खर्च त्या पालकांनी केलेला असतो. त्यामुळे ते पालक आपल्या पाल्याकडून मोठी स्वप्ने पाहतात. मात्र त्यांनी परीक्षेकडे पाठ फिरविल्याने त्यावर चक्क पाणी फेरल्याचे दिसून आले.

एमपीएससीच्या परीक्षेसाठी उस्मानाबाद शहरात तेरा उपकेंद्रावर ३ हजार ७६७ विद्यार्थ्यांच्या आसनाची व्यवस्था करण्यात आली होती.  राज्यससेवा पूर्व परीक्षा (एमपीएससी) - २०२०  ही सकाळी १० ते १२ व दुपारी ३ ते ५ या दोन सत्रांमध्येा पुढील १३ उपकेंद्रावर घेण्या त येणार आहे. उपकेंद्राचा क्रमांक, उपकेंद्राचा नाव व त्या उपकेंद्रावर उपस्थित व गैरहजर (कंसात) परीक्षार्थींची संख्या पुढीलप्रमाणे -  

    उपकेंद्र क्र.१ श्रीपतराव भोसले हायस्कूगल, तळ मजला, मेन रोड, -१९२ (६२), उपकेंद्र क्र.२ श्रीपतराव भोसले ज्युनि . कॉलेज, पहिला मजला, मेन रोड, -३३६ (१०९), उपकेंद्र क्र.३ श्रीपतराव भोसले ज्युनि. कॉलेज, दुसरा मजला, मेन रोड, -३६० (१०६), उपकेंद्र क्र.४ श्रीपतराव भोसले ज्युनि. कॉलेज, तिसरा मजला, मेन रोड, -४०८ (१२९), उपकेंद्र क्र.५ श्रीपतराव भोसले हायस्कू्ल, (आण्णा  ई टेक्नोज) नवीन इमारत, मेन रोड, -३३६ (१३२), उपकेंद्र क्र.६ रामकृष्णा परमहंस महाविद्यालय, नवीन इमारत, मेन रोड, -२४० (७९), उपकेंद्र क्र. ७ छत्रपती शिवाजी हायस्कु्ल, तांबरी विभाग, -३८४ (१३१), उपकेंद्र क्र.८ विद्यामाता हायस्कु्ल, सांजा चौक, औरंगाबाद बायपास रोड, -२४० (७२), उपकेंद्र क्र. ९ शासकीय तंत्रनिकेतन, तुळजापूर रोड,-२४० (८४), उपकेंद्र क्र.१० अभिनव इंग्लिश स्कुडल, भानु नगर, बजाज शोरुमच्या पाठीमागे, मेन रोड - २८८ (९५), उपकेंद्र क्र.११ जिल्हा परिषद कन्यान प्रशाला, शहर पोलीस स्टेशनजवळ - २६४ (७९), उपकेंद्र क्र.१२ रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, पहिला मजला, मेन रोड, तांबरी विभाग, पार्ट – ए-२४० (८४), उपकेंद्र क्र. १३, रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, तळ मजला, मेन रोड, तांबरी विभाग, पार्ट - बी-२३९ (६५) अशा एकूण ३७६७ परीक्षार्थी विद्यार्थ्यांपैकी २५४० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर १२२७ विद्यार्थ्यांनी या परीक्षेकडे पाठ फिरविली आहे.


 कोरोना पार्श्वभूमीवर शारीरिक अंतर राखीत बेसिक सुविधा म्हणून सॅनिटायझर, ग्लोवज व मास्क आदी साहित्य विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये जाण्यापूर्वी उपलब्ध करून देण्यात आले. तसेच त्यांच्या शरीराची तपासणी करण्यात येऊन त्यांना कोणत्याही प्रकारची कोरोनाची लक्षणे नसल्याचे त्यांच्याकडून लेखी लिहून देखील घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे या तपासणी दरम्यान उपस्थित परीक्षार्थी विद्यार्थ्यांपैकी एकही कोरोनाची लक्षणे असलेला विद्यार्थी आढळून आला नाही. त्यामुळे या परीक्षा सुरळीतपणे व दिलेल्या वेळापत्रकानुसार कोणताही अनुचित प्रकार न घडता घेण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी दिली.

From around the web