उस्मानाबाद -कळंब मतदारसंघातील चार ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी अकरा कोटींचा निधी मंजूर

आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
 
dada1

उस्मानाबाद -उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातील चार ठिकाणच्या रस्त्याच्या दर्जोन्नतीसाठी 11 कोटी 70 लाख 78 हजार रुपयांचा निधी राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने मंजूर केला आहे. या रस्त्यांच्या कामांसाठी निधी मिळावा म्हणून आमदार कैलास घाडगे पाटील  यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा -1 अंतर्गत उस्मानाबाद तालुक्यातील एक आणि कळंब तालुक्यांतील तीन अशा एकूण चार रस्त्यांच्या कामासाठी ग्रामविकास विभागाने हा निधी मंजूर केला आहे. यामध्ये कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी ते मांडवा या 7.10 किमी लांबीच्या रस्त्यासाठी पाच कोटी 10 लाख 43 हजार रुपयांचा, राज्यमार्ग ते सात्रा या 2.50 किमी लांबीच्या रस्त्यासाठी एक कोटी 90 लाख 99 हजार रुपयांचा, राज्यमार्ग ते कोकाटेवस्ती या 3 किमी लांबीच्या रस्त्यासाठी दोन कोटी 64 लाख 16 हजार रुपयांचा तर उस्मानाबाद तालुक्यातील जवळा ते गुळवेवस्ती या 2.30 किमी लांबीच्या रस्त्यासाठी दोन कोटी पाच लाख 20 हजार रुपये निधी ग्रामविकास विभागाने मंजूर केला आहे. या निधीतून या चारही गावांसाठी मंजूर रस्त्यांची दर्जोन्नती करण्यात येणार आहे. 

उस्मानाबाद – कळंब मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार कैलास घाडगे पाटील  यांनी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या समवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे उस्मानाबाद -कळंब मतदारसंघातील रस्त्यांच्या या कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करून सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या मागणीची दखल घेऊन विशेष बाब म्हणून हा निधी उपलब्ध करून दिला आहे.

From around the web