उस्मानाबाद जिल्ह्यात १४ रोजी १०८ कोरोना पॉजिटीव्ह , पाच मृत्यू 

 
corona

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज १४ जून (सोमवार ) रोजी १०८ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर १६५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात १ जणांचा मृत्यू झाला तर  मागील काही दिवसातील ४ मृत कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या घटली तरी  मृत्यू संख्या जैसे थे आहे, त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ५६ हजार ९०३ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ५४ हजार ८८२  रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १३३१  रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ६९०   झाली आहे.

आकडेवारी लपविली 

गेल्या २०  दिवसापासून मागील मृत्यूची दररोज किमान ४ ते ६ रुग्णाची नोंद होत आहे. एकीकडे कोरोना रुग्ण दोनशेच्या आत आले असताना, मागील मृत्यू नेमके  कुठून येत आहेत , मागील काळात आरोग्य विभागाने मृत्यूचे आकडे लपविले होते का ? असा प्रश्न विचारला जात आहे. 

From around the web