उस्मानाबाद जिल्ह्यात ६ जून रोजी १०६ कोरोना पॉजिटीव्ह, ४ मृत्यू 

कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ .३२ टक्के तर ‌मृत्यूचे २.२७ प्रमाण टक्के
 
x

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज ६ जून (रविवार ) रोजी १०६ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ३७२ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात १ कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे तर मागील काही दिवसातील ३  मृत कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे. 


उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या घटली असून, अनेक कोरोना सेंटर रिकामे झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी थोडासा सुस्कारा सोडला आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ५५ हजार ९९८ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ५३ हजार ९२ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १२७६ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १६३० झाली आहे.

From around the web